विवेक अग्निहोत्रींची ‘फिल्मफेअर’ वर खोचक टीका

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

बॉलीवूड संबंधित वाद कमी होण्याऐवजी वाढतच जातांना दिसून येत आहे. ज्या पद्धतीने अमीर खान (Ameer Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) हे कोणत्याहि अवॊर्ड शो ला हजार राहत नाही हे आपल्याला माहित आहे, तसेच आता ‘द काश्मीर फाइल्सचे’ (The Kashmir Files) डायरेक्टर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) देखील आता या फिल्मफेअर (Filmfare) अवॊर्ड शो ला हजेरी लावणार नसल्याचे त्यांनी सोशल मीडिया द्वारे सांगितले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला सात विभागांमध्ये नामांकन मिळाले आहेत. मात्र तरीही अग्निहोत्रींनी पुरस्कार सोहळ्यास हजर राहण्यास नकार दिला आहे. ट्विटरवर (Twitter) भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. त्याचसोबत त्यांनी फिल्मफेअरवर भ्रष्ट आणि अनैतिक पुरस्कार सोहळा असल्याची टीका केली. ‘मला माध्यमांतून समजलं की ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सात विभागांमध्ये नामांकन मिळालं आहे. पण मी अत्यंत नम्रपणे या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्याचा भाग होण्यास नकार देत आहे.

काय म्हंटले विवेक अग्निहोत्री
‘फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय कोणालाच चेहरा नसतो आणि कोणालाच महत्त्व नसतं. म्हणूनच फिल्मफेअरच्या झगमगाटात आणि अनैतिक विश्वात संजय लीला भन्साळी किंवा सूरज बडजात्या यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांना चेहरा नाही. त्यांच्यासाठी भन्साळी म्हणजे आलिया भट्टसारखे, सूरज बडजात्या म्हणजे मिस्टर बच्चन यांच्यासारके आणि अनीस बाजमी म्हणजे कार्तिक आर्यनसारखे आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड्समुळेच चित्रपट निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना प्रतिष्ठा प्राप्त होते अशातला भाग नाही. पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे’, अशा खोचक शब्दात त्यांनी आपले मत मांडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.