महिला पोलीस अधिकारी मृतावस्थेत आढळली

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील पूर्व उपनगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ल्याच्या नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामगार नगरमध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Female Police Officer) मृतावस्थेत आढळली. कामगार नगरमधील शरद सोसायटीमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसाह हा नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शीतल येडके असं मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) म्हणून कार्यरत होत्या. परंतु मागील दीड वर्षांपासून त्या सीक लीव्हवर होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली होतं, अशी माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.