तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार ! जाणून घ्या मुहूर्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवाळी सर्वत्र आनंदात जल्लोषात साजरा झाली. आता लग्नाचा धुमधडाका सुरु होईल. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून, याच दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत म्हणजेच ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशीविवाह साजरा करण्यात येणार आहे.

लग्नाच्या मुहूर्तांना तुळशीच्या लग्नापासून सुरुवात केली जाते. तुळशीच्या लग्नापासून हिंदू धर्मात लग्न आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते. ५ नोव्हेंबरलाच चातुर्माससमाप्ती, शनिप्रदोष शाकव्रतसमाप्ती असल्याने या दिवसापासून विवाहसोहळे, मौजीबंधनाचे सनई-चौघडे वाजण्यास प्रारंभ होणार आहे.

शास्त्राप्रमाणे यंदाचे विवाह मुहूर्त

चातुर्माससमाप्ती ते चातुर्मासप्रारंभापर्यंत अर्थात २५ नोव्हेंबर २०२२ ते २८ जून २०२३ या काळात शास्त्रानुसार एकूण ५८ विवाह मुहूर्त येत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये गुरूचा अस्त असल्यामुळे, फक्त रविवार ३० एप्रिल रोजी विवाह मुहूर्त आहे. २०२३ मध्ये २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे.

महिना आणि विवाहाच्या तारखा

नोव्हेंबर : २५, २६,२८,२९

डिसेंबर : २,४,८,९,१४,१६,१७,१८,१९

जानेवारी : १८,२६,२७,३१

फेब्रुवारी : ६,७,१०,११,१४,१६,२३,२४,२७,२८

मार्च : ९,१३,१७,१८

एप्रिल : ३०

मे : २,३,४,७,९,१०,११,१२,१५,१६,२१,२२,२९,३०

जून : १,४,७,८,११,१२,१३,१४,२३,२६,२७,२८

 

Leave A Reply

Your email address will not be published.