भारतीय पेहरावात गेलेल्या तरुणाला विराटच्या रेस्त्रॉमध्ये प्रवेश नाकारला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराज जाहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये कपड्यांमुळे प्रवेश मिळू शकला नाही, असा दावा या व्यक्तीने केला आहे.

एका अज्ञात व्यक्तीने दावा केला आहे की, त्याला विराट कोहलीच्या मुंबईतील जुहू येथील ‘वन8 कम्युन’ या रेस्त्रॉमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, लुंगी परिधान केलेल्या व्यक्तीने दावा केला आहे. की, त्याच्या पोषाखामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. वन8 कम्युन रेस्त्रॉमध्ये कपड्यांमुळे प्रवेश मिळू शकला नाही, असा दावा तामिळनाडूतील या तरुणाने केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
तामिळनाडूचा हा तरुण जुहूच्या वन ८ रेस्त्रॉमध्ये बाहेर उभा राहून व्हिडिओ बनवत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी लुंगी घालती आहे. ‘हे श्री विराट कोहलीचे जुहू येथील रेस्त्रॉ आहे. जे डब्ल्यू मॅरियट जुहू येथे चेक इन केल्यानंतर मी वन८ कम्युन रेस्त्रॉमध्ये आलो होतो. प्रसिद्ध ब्रँडचे कपडे घातल्यानंतरही रेस्त्रॉ व्यवस्थापनाने मला प्रवेश दिला नाही आणि मी घातलेले कपडे त्यांच्या ड्रेस कोडमध्ये समाविष्ट नसल्याचे त्याने सांगितले. मोठ्या निराशेने, मी माझ्या हॉटेलकडे परतलो. ते या प्रकरणी कारवाई करतील की नाही माहित नाही, पण अशी प्रकरणे पुन्हा होणार नाहीत, अशी आशा आहे. मी योग्य तमिळ सांस्कृतिक पोशाख परिधान केला आहे. रेस्त्रॉ व्यवस्थापनाने संपूर्ण तामिळ समाजाचा आणि आपल्या संस्कृतीचा अपमान केला आहे,’ असे तमिळनाडूतील व्यक्तीने म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.