थारा फूफा अभी जिंदा है ! 102 वर्षीय आजोबांची निघाली वरात (व्हिडीओ)

0

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.  102 वर्षीय आजोबांच्या लग्नाच्या वरतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटलं असेल की, त्यांची ही लग्नाची वरात आहे. पण नाही..  प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजोबांनी हे अनोखं  आंदोलन केलं आहे.

https://twitter.com/RamanDhaka/status/1568115137567145985?s=20&t=PbntSRZrf2GAbyxuInNF3g

हरयाणा सरकारने 102 वर्षीय आजोबा दुलिचंद यांना मृत घोषित करून त्यांची पेन्शन बंद केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारून आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र प्रशासन त्यांचे म्हणणे काही ऐकत नव्हते. या भोंगळ कारभाराला कंटाळून आजोबांनी चक्क ही शक्कल लढवली.

आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पैशांच्या नोटांचा हार घालून रोहतक शहरामधून स्वतःची वरात काढली आणि राज्य सरकारकडे आपली पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या मिरवणुकीत ढोलताशा वाजवण्यात आले होते. तर आंदोलक ‘थारा फूफा अभी जिंदा है’ अशा पाट्या हातात घेऊन निषेध करताना दिसत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.