शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

0

मध्यप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरवस्वती (Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी  मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर येथे अखेरचा श्वास घेतला.

ते अनेक दिवसांपासून आजारी होते. नुकताच 3 सप्टेंबर रोजी त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा झाला होता. ते द्वारकेच्या शारदा पीठाचे शंकराचार्य आणि ज्योतिमठ बद्रीनाथ होते. शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सहभाग होता.

शंकराचार्यांच्या निधनानंतर देशभरातील संतांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.