अरेरे ! LIVE शोदरम्यान नेत्यांमध्ये हाणामारी (पहा व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

लाइव्ह टीव्ही डिबेट शोदरम्यान दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय आणि पीएमएल-एनचे दोन नेते एकमेकांशी भिडले. दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की चॅनलच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) सिनेटर अफनान उल्लाह खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते आणि वकील शेर अफझल खान मारवत हे पाकिस्तानी अँकर जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस न्यूज टॉक शोमध्ये चर्चेत सहभागी झाले होते. तिथे एका मुद्द्यावर अचानक वादविवाद सुरू असताना अचानक दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. यादरम्यान दोन्ही नेत्यांना एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

https://x.com/MalikAliiRaza/status/1707413109520961591?s=20

 

लाइव्ह शोदरम्यान अफनान उल्लाह खानने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शिवीगाळ केल्यावर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. इम्रान खान यांना कथित शिवीगाळामुळे संतप्त झालेला अफजल खान मारवत लाइव्ह शोदरम्यान त्यांच्या जागेवरून उठले आणि अफनान उल्ला यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.