भंगार विक्रीत अपहार; महापारेषणचे 8 अधिकारी निलंबित

0

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अकोला महापारेषण आणि कारंजा उपकेंद्रातील भंगार विक्रीत अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणांवरील ८५ हजार २१० किलोपैकी चार हजार ७७५ किलो भंगाराचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

ही कारवाई महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी केली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता रमेश कृष्णराव वानखडे यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल रामदास पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्ता दिनकर शेजोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्याम मेश्राम, उपकार्यकारी अभियंता गोपाल दिलीप लहाने, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत टेहरे, उपव्यवस्थापक वित्त व लेखा सुरेश पेटकर, उपव्यवस्थापक संजीत मेश्राम आदींचा समावेश आहे.

अकोल्यातील महापारेषणच्या वीज उपकेंद्र आणि कारंजा उपकेंद्रात २०१८ साली ८५ हजार २१० किलो वजनाचे भंगार होते. सन २०२२ साली भंगाराचे वजन केले असता, त्यात चार हजार ७७५ किलो भंगार कमी आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळून आलेल्या आठ जणांचे मुख्य अभियंत्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

कारंजा येथील उपक्रेंद्रातून चार हजार ७७५ किलो भंगाराचा अपहार झाला. जवळपास पाच टनाचे भंगार नेण्यासाठी ट्रकची आवश्यकता असते. ते भरण्यासाठी किमान १० ते १२ मजुरांची आवश्यकता भासली असेल. किंवा टप्प्याने भंगार नेण्यात आले असेल असा संशय आहे. असे असतानाही यासंदर्भात कोठेच कोणतीच नोंद नाही. या प्रकरणात अभियंत्यांना निलंबित करण्यात आले, मात्र या प्रकरणाची पोलिस तक्रार करून चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.