स्वीडनमध्ये भारतीयांनी केली ढोल ताशा पथकाची स्थापना

0

स्टोकहोम ;- जागांत सर्वत्र भारतीय वसले असून आपली संस्कृती ते जपून आहेत. अशातच स्वीडनसारख्या प्रगत देशामध्ये गणेश मंदिरात प्रथमच ढोलताशा पथक निर्माण करून सातासमुद्रापार भारतीयांनी आपला डंका वाजविला आहे. याबाबत बोलताना मराठमोळ्या प्रणाली मानकर यांनी स्वराज्य ढोलताशा नावाचे पथक स्थापन केले असून त्यांनी स्वीडनवासीयांची आपल्या पारंपारिक वेषभूषेतून मने जिंकून घेतली आहेत.

प्रणाली बोलताना म्हणाल्या कि, आम्ही उत्साहित आहोत, की स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात झाली आहे. स्वीडनमधील गणेश मंदिरातील आमच्या पहिल्याच परफॉर्मन्सला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आहेत आणि गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले. त्यांनी एकत्रितपणे ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले आहे. .

गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त स्वराज्य पथकाने सलग 2 तास धमाकेदार परफॉर्मन्ससादर केला. याला भाविकांनी जोरदार प्रतिसाद देत, बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या आमच्या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर आपल्या भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव दिला.

परदेशात भारतीय सण-उत्सव परंपरा जपण्याच्या आमच्या प्रयत्नांची आपण आपल्या माध्यमात दखल घेतल्यास, आपल्या समर्थनाने आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित होईल. असे प्रणाली मानकर यांनी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.