दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणीच्या डोक्यात विट मारली

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क 
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणीच्या डोक्यात विट मारून दुखापत केल्याची घटना शहरातील धनाजी नाना काळे नगरात ७ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी सोनाली दिनेश अकुले वय ३० या घरकाम करीत असून ७ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास महिलेया राहत्या घरात घुसून आरोपी गणेश सानप रा. धनाजी नाना काळे नगर याने शिवीगाळ करून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून सोनाली यांच्या डोक्यात विट मारून दुखापत केली. याप्रकरणी सोनाली अकुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.