महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न ; एकावर गुन्हा दाखल

0

जळगाव ;- शहरातील  राहणाऱ्या एका पस्तीस वर्षे महिलेच्या घरात शिरून तिच्याशी अंगलट केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कल्पेश अशोक अमृतकर याने पीडित महिलेला फोन केले मात्र तिने फोन उचलले नसल्याने रात्री साडेबारा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास पीडितेच्या घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून घराचा दरवाजा लोटून घरात येत तिच्याशी अंगलट केल्याचा प्रकार 14 रोजी रात्री साडेबारा वाजता घडला . याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून कल्पेश अशोक अमृतकर यांच्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय रमेश शेंडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.