पारोळा तालुक्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा ;- तालुक्यातील मुंदाणे प्र उ . येथील ४१ वर्षीय इसमाने आपल्या स्वता : च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १४ रोजी सकाळी ८ वाजता घडली. विजय माणिक पाटील ( ४१ ) रा.मुंदाणे प्र. उ. यांनी आपल्या राहत्या घरातील मागिल खोलीत लोखंडी अँगला वायर बांधून गळफास घेतल्याची घटना घडली.

 

त्यास नातेवाईकांनी खाजगी वाहनाने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषीत केले. या बाबत पारोळा पोलिसात पोलिस पाटील अशोक पाटील यांच्या खबरी वरून पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.