मोठी बातमी.. विनायक मेटे यांचं अपघाती निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha community leader) करणारे शिवसंग्राम संघटनेचे (Shiv Sangra) अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. उपचारदरम्यान  विनायक मेटे (vinayak mete) यांनी अखेरचा श्वास घेतला.

विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात मेटे हे जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातात मेटे जखमी झाले. त्यांना तातडीने पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. पण उपचारदरम्यान सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे हे फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या कारने प्रवास करत होते. चालक एकनाथ कदम हे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसऱ्या लेनने जात होते. पण कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक देऊन अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात झाला. यावेळी एक तास कुणाचीही मदत मिळाली नाही, असे मेटेंच्या सहकाऱ्याने सांगितले आहे. शिंदेंच्या आदेशानंतर तपासासाठी घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

जळगावात अनेक कार्यक्रमांना उपस्थिती  

विनायक मेटे यांनी जळगावमध्ये देखील अनेक कार्यक्रम केले होते. जळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीवेळी देखील ते उपस्थित होते. दरम्यान मेटे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच ॲड. दिलीप पोकळे, गजेंद्र पाटील, अरुण जाधव, सुमंत नेवे, सय्यद भाई, राकेश ठाकरे व इतर जळगाव  शिवसंग्रामचे कार्यकर्ते बीड येथे रवाना झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.