ब्रेकिंग.. ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेअर मार्केटमधील (share Market) बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं निधन झालं. बिग बुल (Big Bull) नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज होते. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख होती. कारण, बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती आणि त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असं म्हटलं जातं. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए होते.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या अकासा एअर (Akasa Air founder Rakesh Jhunjhunwala) या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी होती.  झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते. ‘स्टार हेल्थ’मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.