वसंतवाडी येथील तलावात बुडून प्रौढ बेपत्ता

0

जळगाव: तालुक्यातील वसंतवाडी येथे तलावामध्ये रमेश भिका चव्हाण (वय ४०) हे पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. रात्रीपर्यंत पाण्यात इसमाचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

तालुक्यातील वसंतवाडी येथील तलावात रमेश चव्हाण बुडून बेपत्ता झाले. घटनेची माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी मिळाताच त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रशासनाला माहिती दिली.

 

त्या वेळी नायब तहसीलदार दिलीप बारी व त्यांचे सहकारी तसेच म्हसावद पोलिस चौकीचे पोका हेमंत पाटील, प्रदीप पाटील हे घटनास्थळी पोहचले. सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान, सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी जावून त्या इसमाचा शोध घेणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.