जळगाव: शहरातील समता नगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय दिया संदीप बनसोडे या अल्पवयीन मुलीने दि. ४ ऑक्टोंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना सोमवार दि. ९ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.