Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावांतील नेरी नाक्यावर जुगार अड्ड्यावर धाड: 27 जुगारी ताब्यात
    गुन्हे वार्ता

    जळगावांतील नेरी नाक्यावर जुगार अड्ड्यावर धाड: 27 जुगारी ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 10, 2023Updated:October 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

    जळगाव : राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू असलेल्या सोशल क्लबच्या नावाखाली नावाखाली सुरू असलेल्या नेरीनाका परिसरातील मोठ्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे जुगाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी याठिकाणाहून २७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून ६ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शहरातील  नेरीनाका परिसरात सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास नेरीनाका परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याठिकाणाहून २७ जुगारींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ६७ हजारांची रोकड, १८ मोबाईल आणि ४ दुचाकी असा एकुण ६ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अटकेसह कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरु होते.

    .

    या पथकाने केली कारवाई

    ही कारवाई स्था. गु. शाखेचे वरिष्ठ पो. नि. किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनााली सहा.पो.नि. निलेश राजपूत, पो.उ.नि. गणेश वाघमारे, पो.हे.कॉ. राजेश मेढे, महेश महाजन, किरण चौधरी, पो.ना. श्रीकृष्ण देशुख, भगवान पाटील, हरिश परदेशी यांच्या पथकाने केली.

     

    या 27 जुगारींना अटक

    सुनील गबा पाटील (वय ५०, रा. पाचोरा), संदीप रामा गोपाल (वय २८, रा. वावडदा), पंढरी बाबुराव कोळी (वय ३०, रा. भादली), जगदीश सोमनाथ हळवे (वय ३८, रा. जुने जळगाव), स्वप्निल शंकर हवलदार (वय ३३, रा. मेहरुण ), गजानन रतन चौधरीवय ५०, रा. तुकाराम वाडी), केशव एकनाथ भोळे (वय ६५, जुना खेडी रोड), नामदेव मानसिंग पाटील (वय ४८, रा. मन्यारखेडा), नंदकिशोर रतन चौधरी (वय ४३, रा. तुकाराम वाडी), धनंजय दिनेश कंडारे (वय २७, रा. शनिपेठ), नितीन भास्कर गायकवाड (वय ३९, रा. जुने जळगाव), , गणेश तुकाराम पाटील (वय ३६, रा. गुरुकुल कॉलनी), रवी कमलाकर बाविस्कर (वय ३६, रा. वाल्मीक नगर), आकाश प्रभाकर पाटील (वय ३०, रा. जुना खेडी रोड), पिंटू सुधाकर भोई (वय ३७, रा. टाळकी, ता. धरणगाव), इब्राहिम अकबर सय्यद (वय ६०, मासूमवाडी), इम्रान शेख सय्यद (वय ४४, रा. मासूमवाडी), मनोज रमेश शिनकर (वय ३०, रा. मारुती पेठ), चंद्रकांत शंकर पाटील (वय ६०, रा. मन्यारखेडा), रमेश पुंडलिक सोनार (वय ७१, गिरणा टाकी परिसर), मुकेश शांताराम पाटील (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी), भरत दिलीप बाविस्कर (वय ३८, रा. लक्ष्मी नगर), अरुण कौतिक चौधरी (वय ४७, रा. सुप्रीम कॉलनी), मयूर रामचंद्र कोल्हे (वय ३४, रा. विठ्ठल पेठ), दत्तू भिका सोनवणे (वय ६८, रा. कांचन नगर), नरेंद्र एकनाथ ठाकरे (वय ३३, रा. मेस्को माता नगर), सीताराम ज्योतीराम सोनवणे (वव ४०, रा. तुकाराम वाडी) यांना अटक केली.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif