Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा – पालकमंत्री
    उत्तर महाराष्ट्र

    जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा – पालकमंत्री

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 2, 2024Updated:March 2, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;--प्रस्तावित जिल्ह वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय “ वारकरी भवन ” बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती.त्यानुसार खेडी शिवारात ६ कोटी ०६ लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.
    वारकरी भवनाचे भूमिपुजन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रस्तावित आहे. त्या नियोजनासाठी शनिवारी दि. २ मार्च २०२४ रोजी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सोमवार दि.४ मार्च २०२४ रोजी सायं. ६:०० वाजता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते वारकरी भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन होणार या भूमिपूजन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून सदर कार्यक्रम पूर्णत: वारकरी पद्धतीने पण शासकीय राजशिष्टाचार सांभाळून पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्री व आमदार- खासदार यांच्या सहकार्य व सहमतीने जिल्हा नियोजन समिती निधीमधून मंजूर झालेले हे वारकरी भवन महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण ठरणार असून त्यासाठी प्रशासकीय योगदान देण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्य समजतो आणि वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार आमदार व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.
    या भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजन बैठकीस ह.भ.प. परमेश्वरजी महाराज गोंडखेल, ह.भ.प. गोविंद महाराज केकत निंभोरा, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. महंत संजीवदास महाराज सावखेडा, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर, ह.भ.प. सुधाकर महाराज मेहूण, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. अंकुश महाराज मनवेल, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. गजाननजी महाराज वरसाडे , ह.भ.प. सुशील महाराज विटनेर, ह.भ.प. शाम महाराज पिंपळगाव, ह.भ.प. यशवंत महाराज कमळगाव, ह.भ.प. कन्हैया महाराज, ह.भ.प. विजय महाराजभामरे, ह.भ.प. रुपचंद बाबा दहिवदखुर्द, ह.भ.प. सदाशिव महाराज साकरीकर, ह.भ.प. दिनकर महाराज कडगावकर, यांचेसह संपूर्ण जिल्ह्यातून दिंडीचालक, वारकरी संस्थाचालक, मठाधिपती यांचेसह महिला व पुरुष कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले . सदर बैठकीचे संचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले . गजानन महाराज यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. परमेश्वर म.,आवारकर महाराज व समाधान म.भोजेकर यांची समयोचित भाषणे झाली.

     

    Chief Minister Eknath Shinde Guardian Minister and Water Supply Minister Gulabrao Patil varkari bhavan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif