जात, धर्म, भाषाच्या नावाने मते मागू नये ; निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्षांना सूचना

0

नवी दिल्ली ;- शुक्रवारी निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना कडक सूचना दिल्या आहेत. जात, धर्म, भाषा आणि इतर अनेक मार्गांनी मते मागू नयेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवार आणि स्टार प्रचारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

जातीय भावनांच्या आधारावर अपील करू नये, विविध गटांमध्ये मतभेद वाढवणाऱ्या किंवा शत्रुत्व वाढवणाऱ्या अशा कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये, मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने खोटी विधाने किंवा निराधार आरोपांचा प्रचार करू नये, वैयक्तिक हल्ले टाळले पाहिजेत आणि राजकीय भाषणात सभ्यता जपली पाहिजे, निवडणूक प्रचारासाठी मंदिर/मशीद/चर्च/गुरुद्वारा किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करू नये, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या विरुद्ध मानली जाणारी कोणतीही कृती किंवा विधाने टाळावी, असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारमाध्यमांना देऊ नयेत, सोशल मीडियावर संयम ठेवावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे टाळा, आयोगाने सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता आणि कायदेशीर चौकटीत राहावे असे आयोगाने निर्देश जारी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.