एकात्मिक आदिवासी उन्नती मंडळ वरणगाव तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा.

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आयुध निर्माणी वरणगाव येथील कम्युनिटी हाॅलमध्ये एकात्मिक आदिवासी उन्नती मंडळातर्फे जागतिक आदिवासी दिवस दि.09 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आ.नि.वरणगावचे महाप्रबंधक अजयकुमार सिंह हे होते. याप्रसंगी सर्वप्रथम महाप्रबंधक यांचे हस्ते द्वीप प्रज्वलन करून क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांचे प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले. गुड्डू लाल मिना टुलरुम सेक्शनचे डीव्हीजनल आॅफिसर, व बुलेट सेक्शनचे ज्यु.वर्क्स मॅनेजर गुलाब ठाकूर यांनीही भगवान बिरसामुंडा यांचें प्रतीमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमात विविध संघटनांचे पदाधिकारी, जे सी एम फोर्थ चे मेंबर, कार्यसमिती मेंबर्स हजर होते. कार्यक्रमात बालासोर अपघातात मृत्यू पावलेले, मणिपूर मध्ये हिंसाचारात मृत्यु पावलेले, साहित्यिक, नेते, अभिनेते, आयुध निर्माणी मध्ये मृत झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली .

त्यानंतर एकात्मिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष ए.डी व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अजयकुमार सिंह, गुड्डू लाल मिना व गुलाब ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरण प्रेमी म्हणून ओळख असलेले एस के ठाकूर यांनी इस्टेट परिसरात शेकडो झाडे लाऊन त्यांची जोपासना सुध्दा करत आहेत. यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे कु. पौर्णिमा अशोक व्यवहारेने निट परिक्षेत पास होऊन एम.बी.बी.एस ला मुंबई येथे प्रवेश घेतल्याबद्दल पौर्णिमा हिच्या आई संगीता अशोक व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला.

जागतीक आदिवासी गौरव दिना बद्दल कार्यक्रम प्रसंगी आपले विचार काही वक्त्यांनी आपल्या भाषणात प्रकट केलेत,या प्रसंगी विलास चिकणे, वैशाली पवार, चि.हर्षल ठाकूर यांनी आपल्या भाषणात आदिवासी दिना बद्दल सविस्तर माहिती सादर केली. व आदिवासी लोकांसाठी हा गर्वाचा दिवस असुन सर्वांनी या मध्ये भाग घेऊन उत्सव साजरा करण्याबद्दल आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अजयकुमार सिंह यांनी या जागतीक आदिवासी दिनाबद्दल माहीती देऊन सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.

यामध्ये सपना मिना, माया मिना, पुजा मिना, आशा मिना, सुनील बारेला, सोनी पावरा, मानस वैभव ठाकूर यांनी या प्रसंगी भाग घेऊन पारंपारिक नृत्य सादर केलीत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकात्मिक उन्नती मंडळाचे जनरल सेक्रेटरी वासुदेव ठाकूर यांनी केले. तर आभार प्रदर्शन आर डी बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गणेश बंडु ठाकूर, पुनमचंद पारधी, राहुल कोळी, महेश ठाकूर, प्रताप केरकत्ता यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.