महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले काला गुणाचे सादरीकरण

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमात आपल्या अप्रतिम कला गुणाचे सादरीकरण करीत पालकासह शिक्षकाची शाब्बासकी मिळवली. शहरातील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले कला गुणाचे सादरीकरण वरणगाव प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमात आपल्या अप्रतिम कला गुणाचे सादरीकरण करीत पालकांसह शिक्षकाची शाब्बासकी मिळवीली.
शहरातील महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळच्या सुमारास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील यांचे हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले तर संध्याकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांन साठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शाळेय समीतीचे अध्यक्ष चंद्रकांत बढे, व प्रमूख पाहुणे सहपोलीस निरिक्षक आशिष आडसुळ, उपनिरिक्षक परशुराम दळवी यांच्या हस्ते नटराज व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करीत द्विप प्रज्वलीत करीत स्वागत गीताचे सादरी करण करण्यात आले. आभ्यासा सोबत विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कलागुणाना वाव देण्यासाठी शालेय स्तरावर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजन केले पाहीजे.

त्यामुळे विद्यार्थ्याना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी वाव मिळते यासाठी पालकांनी देखील प्रोत्साहित केले पाहीजे असे बढे यांनी सांगितले तर मुख्याध्यापक यांच्या प्रास्तावीके नंतर रंगारंग कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी इ.पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी, नृत्य, व एकपात्री अभिनयाचे सादरी करण करण्यात आले. त्यात पालक व शिक्षकांनीसंह श्रोत्यानी विद्यार्थ्यांच्या कलेला दाद देऊन प्रोहत्सानपर रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास संस्था संचालक ज्ञानदेव झोपे, चंद्रशेखर झोपे, प्रदिप भंगाळे, सुनिल ब-हाटे, बापू चौधरी, गोविदा माळी, विक्रम देशमूख, राजेंद्र चौधरी, संजय चौधरी, रमेश चौधरी, उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.आर.पाटील, सिमा ठाकुर, मगेश सोनार यानी केले तर गोपाळ पाटील यानी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.