अडावद येथे ४ हजारांची लाच घेतांना पोलिसासह पंटरला अटक

0

लोकशाही न्युज नेटवर्क
वाळूच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या अडावदमधील पोलीस कर्मचार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस अंमलदार योगेश संतोष गोसावी ३६, रा.पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद) व होमगार्ड चंद्रकांत काशीनाथ कोळी (३६, रा.कोळीवाडा, अडावद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

वाळू वाहतूक करण्यासाठी कोणतीही कारवाई करून नये यासाठी अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी याने पंटरच्या माध्यमातून ४ हजाराची लाच मागितली होती.त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याची सत्यता पडताळणीसाठी जळगावच्या एसीबी पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी सापळा रचून अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गोसावी आणि खासगी पंटर चंद्रकांत कोळी यांना पकडले आहे. विशेष म्हणजे अडावद पोलीस ठाण्याच्या आवारातच खासगी पंटरने लाच स्विकारल्याने त्याला जागेवरच ताब्यात घेतले.

ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ,एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने केली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.