विद्यापीठाच्या शाश्वत विकासासाठी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना विजयी करा

0

भडगाव (सागर महाजन) लोकशाही न्युज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शाश्वत विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व काळानुरूप सर्वसमावेशक नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी पदवीधर अधिसभा (सिनेट) मतदारांनी निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाचे १० ही उमेदवार विजयी करावेत असे आवाहन विद्यापीठाचे नवनिर्वाचित व माजी सदस्यांनी केले आहे.

विद्यापीठ स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह करणाऱ्या विद्यापीठ विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या व संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी व महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ कर्मचारी या सर्वच घटकांच्या विकासासाठी विद्यापीठ विकास मंचचे प्राधिकरण सदस्य काम करतात, ही विद्यापीठ विकासाची प्रक्रिया सतत चालू राहावी, विद्यार्थी केंद्र बिंदू मानून निर्णय करण्याचा आग्रह यापुढेही धरण्यासाठी उद्या होणाऱ्या पदवीधर अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाचे खुल्या गटातील सर्वश्री मराठे अमोल साहेबराव, निकम सुनील राजधर, पाटील अमोल नाना, सोनवणे अमोल मुरलीधर, झोपे निलेश रमणराव, ओबीसी गटातील झाल्टे नितीन छगन, एस.सी. गटातील खरात दिनेश उत्तम, एसटी गटातील ठाकूर नितीन लीलाधर, एन.टी. गटातील चव्हाण दिनेश दलपत व महिला गटातील महाजन स्वप्नाली तुळशीराम या विकासाची दृष्टी असलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन नवनिर्वाचित अधिसभा सदस्य सर्वश्री नंदकुमार बेंडाळे, व्ही.टी. जोशी (पाचोरा), डॉ. एस.टी. पाटील (धुळे), निशांत रंधे (शिरपूर), डॉ. दिपीका अनिल चौधरी (कुसुंबा), भरत माणिकराव गावित (नवापूर), प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य व्ही. आर. पाटील, प्राचार्य एस.एन. भारंबे, प्राचार्य एस. पी. पाटील, प्राचार्य सुनील पवार, डॉ. वैशाली पाटील, डॉ. संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा.गजानन पाटील, प्रा.अजय पाटील, एन मुक्ता प्राध्यापक संघटनेचे डॉ.नितीन बारी, डॉ. अविनाश बडगुजर व सर्व पदाधिकारी व माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, प्राचार्य डॉ. राजू फालक, डॉ. जे. बी. नाईक, विवेक लोहार, डॉ. प्रिती अग्रवाल, दीपक बंडू पाटील, डॉ. महेश घुगरी, ॲड. संदीप सुरेशराव पाटील, भरत माळी, सौ पूनम आशिष गुजराती (चोपडा), दिलीप रामू पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, प्राचार्य प्रमोद पवार, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य व्ही. आर. पाटील, प्राचार्य रेड्डी, प्रा. संजय शेखावत, प्राचार्य डॉ. लता मोरे, प्राचार्य ए.पी. खैरनार, प्राचार्य एस. आर. जाधव, प्राचार्य डॉ. मिलिंद बिदलीकर, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, प्राचार्य शेख, ॲड.रोहन बाहेती, पंकज बोरोले, नीरज अग्रवाल, प्रभाकरराव चव्हाण (शिरपूर), राजगोपाल भंडारी, तुषार विनायक रंधे, ॲड. संजय जाधव, डॉ. मंगलाताई देसले, इंद्रसिंग वसावे, सरकार साहेब रावळ, काशीद साहेब, आशिष अजमेरा, डॉ. संजय देसले, सुनंदाताई पाटील, शरदभाई शहा, अमृतराव कासार, बाबासाहेब शिसोदे, दिपक पुरुषोत्तम पाटील, अभिजीत मोतीलाल पाटील, सुरेश रामराव पाटील, रावसाहेब शेखावत, व्ही.सी. चौधरी, रमण देविदास भोळे, इक्बाल शेख, प्रकाशचंद्र कवडीया, मनोज पाटील, आर. व्ही. पाटील, ॲड. महेंद्र निळे इत्यादींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.