वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान यांनी दाखविला हिरवा कंदील

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मकर संक्रांतीनिमित्त वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान धावणार आहे. यासह देशात वंदे भारत गाड्यांची संख्या 8 झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मकर संक्रांत आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तेलंगणा-आंध्र दरम्यानचा वारसा जोडण्याचे काम करेल. श्रद्धा आणि पर्यटनाशी संबंधित ठिकाणे रेल्वेच्या मार्गावर येतात, त्यामुळे भारत धार्मिकदृष्ट्याही मजबूत होईल.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, आज आर्मी डे देखील आहे. प्रत्येक भारतीयाला लष्कराचा अभिमान आहे. देशाच्या आणि सीमांच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराचे योगदान, त्यांचे शौर्य अतुलनीय आहे. भारत आपल्या स्वप्नांसाठी आणि आकांक्षांसाठी नेहमीच पुढे असतो. यासोबतच आज या सणासुदीच्या वातावरणात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला एक अद्भुत भेट मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.