टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतले पद्मनाभ स्वामींचे दर्शन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होत आहे. सामन्यासाठी शुक्रवारीच भारतीय संघ केरळच्या तिरुअनंतपुरम येथे पोहोचला होता. दरम्यान, सामन्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडूंनी येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतले. . याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरममध्ये तिसरा वनडे सुरू आहे. यापूर्वी शनिवारी भारतीय संघातील काही खेळाडूंनी येथील जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी संघातील काही खेळाडू आणि BCCIचे काही अधिकारी उपस्थित होते. खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहल (l), सूर्यकुमार यादव ,वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर होते.

मंदिराच्या मुख्य द्वारावर या खेळाडूंनी एक फोटोही काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये भारतीय खेळाडू पांढऱ्या लुंगीमध्ये दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.