पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येते. अशीच उष्माघाताची घटना पारोळा तालुक्यातील वीचखेडा येथे घडली आहे. येथील वीस वर्षीय तरुणीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त से कि, पारोळा तालुक्यातील वीचखेडा येथील पुनम दगडु मोरे(२०) हिला तब्येत बरी नसल्याने ताप आल्याने उपचारासाठी नातेवाईक दगडु भावराव मोरे, – बहीण अरुणाबाई दगुड मोरे, आई दगुबाई कुशाल गायकवाड यांनी पारोळा येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांनी एका दुसऱ्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथे घेवुन जाण्यास सांगितल्याने, दरम्यान पुनमला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.