UPI बाबत आजपासून लागू होणार नवीन नियम ; जाणून घ्या माहिती

0

नवी दिल्ली ;- लहान सहान ते मोठ्या व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI चा वापर होतो. मोबाइलद्वारे तत्काळ पैशांची देवघेव करण्यासाठी UPI वापरण्यात येतं. हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा पेमेंट मोड देखील ठरला आहे.

UPI लॉन्च झाल्यापासून, हिंदुस्थानात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. UPI पेमेंटची व्याप्ती वाढवण्यासाठी, हिंदुस्थानच्या रिझर्व्ह बँक (RBI) ने काही उपाय आणि बदल जाहीर केले आहेत जे 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील.

महत्त्वाचे म्हणजे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने Google Pay, Paytm, PhonePe इत्यादी पेमेंट अॅप्स आणि बँकांना UPI आयडी आणि नंबर जे एक वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नाहीत ते तात्काळ बंद करण्यास सांगितलं आहे. NPCI नुसार UPI व्यवहारांसाठी दैनंदिन पेमेंट मर्यादा आता कमाल ₹ 1 लाख असेल. यासोबतच, RBI ने UPI पेमेंटचा वापर व्यापक करण्यासाठी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना UPI पेमेंटची व्यवहार मर्यादा 8 डिसेंबर 2023 रोजी ₹ 5 लाख केली.

ऑनलाइन वॉलेट्स सारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) वापरून केलेल्या ₹ 2,000 च्या वरच्या काही व्यापारी UPI व्यवहारांवर 1.1 टक्के इंटरचेंज फी देखील असेल.

ऑनलाइन पेमेंटच्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, प्रत्येक वेळी युझर्सने ₹ 2,000 पेक्षा जास्तीचे पहिले पेमेंट केल्यावर ज्या युझर्ससोबत त्यांनी यापूर्वी व्यवहार केले नाहीत त्यांचा व्यवहार पूर्ण होण्यासाठी आता चार तासांची वेळ मर्यादा लागू होईल. यामुळे फसवणूक होत असल्यास चार तासाच्या आत अॅक्शन घेतल्यास ती रक्कम समोच्याच्या खात्यात जमा होण्यापासून रोखता येणार आहे.

यासह UPI वापरणाऱ्यांना आता लवकरच UPI ‘टॅप आणि पे’ असा पर्याय देखील थेट उपलब्ध होणार आहे.

RBI जपानी कंपनी Hitachi च्या मदतीनं, आता संपूर्ण देशाभरात UPI एटीएम आणणार आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी QR कोड स्कॅन करू शकता.

विशेष म्हणजे, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही हिंदुस्थानातील रिअल-टाइम पेमेंट प्रणाली आहे जी स्मार्टफोन वापरून विविध बँकांमधील झटपट व्यवहार करू देते.

ऑगस्ट 2023 मध्ये, UPI ने 10 अब्ज व्यवहार पार करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं की, देशात महिन्याला 100 अब्ज युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार करण्याची क्षमता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.