राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता !

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

देशात सर्वत्र बदलते वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पूर्व भारतातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशाच्या (Odisha) बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

देशात या ठिकाणी उष्णतेची लाट संपली
बर्‍याच दिवसांच्या तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर, पश्चिमी विक्षोभ आणि उत्तर प्रदेशमधील चक्रीवादळामुळं बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णता कमी झाली आहे, असं शुक्रवारी आयएमडीच्या अहवालात म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये 10 दिवसांनी, बिहारमध्ये 7 दिवसांनी आणि ओडिशामध्ये 5 दिवसांनंतर उष्णतेची लाट संपली आहे.

कुठे होणार पाऊस
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh), आसाम (Assam) आणि मेघालयमध्ये (Meghalaya) मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडं पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि पंजाबमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशामध्ये हलका पाऊस पडू शकतो. 22 आणि 23 तारखेला ओडिशामध्ये आणि 24 एप्रिल 2023 रोजी बिहारमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आज 22 एप्रिल रोजी छत्तीसगड आणि विदर्भाच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.