प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आत्मनिर्भर होण्याची ‘गुरुकिल्ली’

0

खा. उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन ; अमळनेर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अर्थात पि एम एफ एम ई योजनेतून विविध क्षेत्रात नवनवीन उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य दिले जात आहे. आपण कोणता व्यवसाय करायचा ते एकदा ठरवा. त्यासाठी नियुक्त संसाधन व्यक्ती आपल्याला प्रोजेक्ट तयार करून बँकांकडून मंजुरीसाठी मदत करतात. माञ यासाठी सकारात्मक भूमिका ठेवा. नक्कीच आपला उद्योग उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षभरात 750 नविन उद्योग उभारणीचा माझा प्रयत्न असून चारशे पेक्षा अधिक महिला भगिंनीनी विविध उद्योग सुरु करुन आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडला असुन त्यांना भेटा त्यानी कसा उद्योग उभा केला याविषयी माहिती घ्या.पी एम एफ एम ई योजना ही आर्थिक उन्नतीची गुरुकिल्ली आहे. असे आग्रही प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.अमळनेर तालुक्यातील देवळी, श्रीराम मंदिर समोर माळीवाडा तसेच हेडावे रस्त्यावरील महावीर आईस्क्रीम उद्योगाचा शुभारंभ खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, विधी सेलचे प्रदेश पदाधिकारी ऍड.व्ही.आर.आप्पा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, शेतकी संघाचे सचिव संजय पाटील बहादरवाडी, उपसभापती भिकेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख,दादाराव जाधवर (उपविभागीय कृषी अधिकारी, अमळनेर) , भरत वारे (तालुका कृषी अधिकारी अमळनेर), मयूर कचरे( मंडळ कृषी अधिकारी अमळनेर), भूषण पाटील (तालुका तंत्र व्यवस्थापक), श्रीमती कविता बोरसे (कृषी सहाय्यक ) दिनेश पाटील ( कृषी सहाय्यक अमळनेर), संसाधन व्यक्ती समाधान पाटील, राकेश पाटील,गोकुळ पाटील, आनंदा पाटील, माजी सरपंच देवळी अशोक पाटील, गोकुळ परदेशी, दिलीप ठाकूर,संजय पाटील,मनोज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

असा उद्योग असे लाभार्थी

यावेळी संसाधन व्यक्ती समाधान पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून सातत्याने बँकांच्या माध्यमातुन प्रकरण मंजुर व्हावी यासाठी जिल्हाधिकारी , बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्यात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये साडेसातशे नवीन उद्योग सुरू करण्याचे खासदार उन्मेशदादा पाटील यांचे उद्दिष्ट असून यासाठी जेथे जातील तिथे योजनेची माहिती सांगून इच्छुक जनतेला योजनेचे महत्त्व पटवून दिल्याने आज मोठ्या प्रमाणावर गावोगावी नवीन उद्योग उभे राहत असल्याचे आनंद असून आज त्यांच्याच पाठपुराव्यातून ज्योती प्रकाश पाटील यांनी देवगाव देवळी येथे कुलस्वामिनी पापड उद्योग सुरु केला. तर रुपाली शिरीष जाधव यांनी श्रीराम मंदिर समोर माळी वाडा येथे निर्जलीकरण (Dehydration unit) देवहिरा गृह उद्योग उभारला आहे. तर श्वेता भूपेंद्र जैन यांनी जिल्हयातील मोठया क्षमतेचे मिल्क मेड डेअरी अँड अग्रो प्रॉडक्ट आईस्क्रीम तयार करण्याचे नवे युनिट सुरू केले आहे. लाभार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.