जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल !

0

 

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा सिद्ध झाली असून ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकन कंपनीने ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्ट (जागतिक नेते मान्यता यादी) प्रसिद्ध केली आहे.

तर या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर आले आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट ही एक अमेरिकन कंपनी आहे, या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जागतिक नेत्यांमध्ये सर्वात शक्तिशाली नेते असे वर्णन केले आहे. ही कंपनी २०१४ मध्ये सुरू झाली, ज्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या कंपनीचे काम जागतिक स्तरावर डेटा इंटेलिजन्सचे आहे. मॉर्निंग कन्सल्ट ही सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान आधारित कंपनी मानली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ टक्के मिळाल्याने त्यांना या यादीत पहिला क्रमांक मिळाला आहे. त्याच वेळी, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 61 टक्के मान्यता रेटिंगसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या या यादीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 55 टक्के जागतिक नेते मान्यता रेटिंग मिळाली आहे. त्यासोबतच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 49 टक्के रेटिंग मिळाली असून त्या यादीत मेलोनीने चौथ्या क्रमांकांवर आहेत. याशिवाय ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत, ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा यांनाही जॉर्जिया मेलोनीप्रमाणेच 49 टक्के रेटिंग मिळाले आहे.

जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मात्र ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. बायडेन यांना केवळ 41 टक्के मंजूरी रेटिंग मिळाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 39 टक्के मान्यता रेटिंगसह ते सातव्या क्रमांकावर आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना ३८ टक्के मान्यता मिळाली असून ते या यादीत ८व्या क्रमांकावर आहेत.ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची मान्यता रेटिंग 34 टक्के आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.