उमेश कोल्हे प्रकरण; आरोपी शमीम अहमदवर दोन लाखांचे बक्षीस – एनआयए

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला शमीम अहमद उर्फ ​​फिरोज अहमद याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने शमीमबद्दल माहिती देणाऱ्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा एनआयएने आतापर्यंत सुमारे आठ आरोपींना अटक केली आहे.अमरावती येथील मेडिकल स्टोअरचे मालक उमेश कोल्हे यांची हत्या केवळ नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यामुळे झाली.

54 वर्षीय केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी हत्या झाली होती. अमरावती पोलिसांनी 22 जून रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही घटना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान उमेश दुकान बंद करून दुचाकीवर घरी परतत असताना घडली. यादरम्यान उमेशचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी हे त्याच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवरून चालले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश महिला महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच एका तरुणाने दुचाकीवरून उतरून उमेशच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात उमेश रस्त्यावर पडला. यानंतर संकेतने त्यांना रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

एनआयएने 2 जुलै रोजी गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कलम 120ब (गुन्हेगारी कट रचण्यासाठी शिक्षा), 302 (हत्यासाठी शिक्षा), 153अ (धर्म, जात, स्थळाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) हे कलम दाखल केले होते. गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.