आईने रागावले म्हणून मुलीने संतापात घेतली रेल्वेखाली उडी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. मथुरा येथील १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आईसोबत भांडण झाल्याच्या रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ख़ुशी शर्मा असे मृत मुलीचे नाव आहे. ती ९वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आईने कानाखाली मारल्याच्या रागातून खुशीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनांनतर खुशीचा मृतदेह तिच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, मृत मुलीचे वडील संवीर शर्मा रिक्षाचालक आहे. ते ओम नगर परिसरात राहतात. रामवीर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मोठा मुलगा १२वीचा विद्यार्थी आहे. तर लहान मुलगी सहावीत शिकते. मृत ख़ुशी नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. बुधवारी ख़ुशी आणि तिच्या आईमध्ये भांडण झाले. यात रागाच्या भरात आईने खुशीच्या कानाखाली मारली. त्याच रागात खुशी न जेवता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी खुशी शाळेत जायला तयार नव्हती. त्यावेळी तिच्या आईने रागाच्या भरात पुन्हा खुशीला मारले आणि जबरदस्ती शाळेत पाठवले.

यानंतर ख़ुशी रागाच्या भारत शाळेलट न जात मथुरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. रागाच्या भारत तिने घावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान मुलगी शाळेतून परत न आल्याने आईला चिंता वाटू लागली. आईने शोधाशोध केली असता, खुशीने आत्महत्या केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.