उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क;
उत्तराखंड येथे असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कजवळील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्यासमोर वाघ येतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ एकदा पाहाच
Imagine, you are passing through a deserted road and a tiger comes in front of you. What will you do then?
Will you face it or do what this youth did in this video?
This incident took place at Girija Mata temple located near Ramnagar, Nainital. pic.twitter.com/UMtoLIuDHg
— Uttarakhand (@UttarakhandGo) December 7, 2023
व्हायरल व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक्स @UttarakhandGo या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या उत्तराखंडामध्ये वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाघांची संख्या वाढत असली तरी स्थानिकांची भीती ही दुपटीने वाढू लागली आहे. व्हायरल व्हिडिओ हा कुमाऊँच्या प्रसिद्ध गर्जिया मंदिराजवळचा आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती सकाळी रस्त्यावरून जात आहे. निवांत चालत जात असताना,काही अंतरावरच त्याच्यासमोर अचानक वाघ येतो. वाघ समोर आलाय हे दिसताच तो व्यक्ती तिथून पळ काळतो. मात्र दिलासा देणारी बाब अशी की,वाघाने त्या व्यक्तीला काहीच केलं नाही. त्या व्यक्तीने कधीच असा विचार केला नसेल की, रस्त्यावरुन जात असताना अचानक आपल्यासमोर वाघ येईल.