संसदेत पोहोचला ‘ॲनिमल’चा वाद, काँग्रेसच्या नेत्याने साधला निशाणा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाला एकीकडे बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या काही सीनमुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट स्त्रीविरोधी असल्याची टीका शोषक मीडियावर अनेकांनी केली. ॲनिमलचा वाद थेट संसदेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. छत्तीसगडच्या काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी रणबीर कपूरच्या या चित्रपटातील कंटेटवरून जोरदार निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट पाहिल्यानंतर माझी मुलगी थिएटरमधून रडत बाहेर आली, असं त्यांनी म्हटलंय.

रणजित रंजन म्हणाल्या, “चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आम्ही लहानपणापासून चित्रपट बघत आले आहोत. अशा चित्रपटांचा तरुणाईवर खूप मोठा परिणाम दिसून येत आहे. ‘कबीर सिंग’, ‘पुष्पा’ आणि आता ‘ॲनिमल’सारख्या चित्रपटांमधून तरुणाईला काय शिकायला मिळेल? प्रश्न त्यांनी उपस्थित करू त्यांच्या मुलीची अवस्था वाईट झाली होती. एवढी हिंसा पाहून त्यांची मुलगी रडत रडत चित्रपट गृहाच्या बाहेर पडली असं त्यांचं म्हणणं होत.

“चित्रपटात इतकी हिंसा दाखवली आहे, महिलांचा विनयभंग केला जातोय. अशा चित्रपटांचा, अशा हिंसेचा आणि अशा नकारात्मक भूमिकांचा आपल्या अकरावी-बारावीतल्या मुलांवर परिणाम होऊ लागला आहे. ते अशा भूमिकांना आपला आदर्श समजू लागले आहेत. अशा गोष्टी आपण चित्रपटांमध्ये पाहतोय, म्हणूनच समाजातही आपल्याला अशा पद्धतीची हिंसा दिसून येतेय”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. फक्त रंजीत रंजना नाही तर, गीतगार स्वानंद किरकिरे यांनीसुद्धा ‘ॲनिमल’ चित्रपटावर जोरदार टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.