शिवसैनिकाने रक्ताने लिहीले उद्धव ठाकरेंना पत्र

0

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोहा तालुक्यातील बोरगाव येथील शिवसैनिक सुरज तेलंगे (Shiv Sainik Suraj Telange) याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले आहे.

सूरज तेलंगे याने शिवसेना आणि हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेली निष्ठा या पत्रात व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यात सत्ता संघर्ष निर्माण होऊन शिवसेनेतून बंडखोरी करत अनेक आमदार, खासदार, मंत्री यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत आपला वेगळा गट केला.

अशा या संकटात उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी या युवा  शिवसैनिकाने स्वताच्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने लिहिले आहे की, ‘मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना पक्षासाठी काम करेन. कोणत्याही परिस्थितीत मी सदैव मातोश्रीशी एकनिष्ठ राहिल अशी प्रतिज्ञा त्यांनी याप्रसंगी घेतली व हे पत्र मातोश्रीवर पाठवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.