उदयपुरमध्ये हिंदु युवकाची हत्या करणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करा (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजस्थानमधील उदयपुर येथे दिनांक २८/०६/२०२२ रोजी कन्हैया तेली या नावाच्या हिंदु व्यक्तीनी धार्मिक द्वेषातुन अमानुष हत्या करून त्याना व्हिडीओ बनवुन, हिंदु धर्मियांना धमकविण्यात आले आहे. तसेच देशाचे मा. पंतप्रधानांची सुध्दा अशीच हत्या करु असे धर्मांध जिहादींनी व्हिडीओ बनवुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दहशत पसरविण्याचे दुष्कृत्य केले आहे.

थेट प्रक्षेपण👇

या घटनेमागे मोठे देशविघातक षडयंत्र असल्याचे दिसुन येत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार राजस्थान राज्यामध्ये घडत असुन तेथील हिंदु समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. त्यावर तेथील काँग्रेसशासित राज्य सरकार दुटप्पीपणे भुमिका घेत असल्याने हिंदु धर्मियांवर अन्याय होत आहे. या प्रकारच्या धर्मांध शक्तींमुळे देशाचे संविधान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

तरी या धर्माध जिहादींना व त्यामागे उभ्या असलेल्या देश विरोधी शक्तींना धडा शिकविण्यासाठी भारत देशाचे मा. राष्ट्रपती महोदय व मा. पंतप्रधान यांनी त्वरीत योग्य ती दखल घेऊन कठोर कारवाई करावी व राजस्थानमधील हिंदु विरोधी राज्यसरकार बरखास्त करावे व संपुर्ण हिंदु समाजाला सुरक्षित करावे. तसेच भारतात अशी हिंसक मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्यावर ही कठोर कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर त्वरित आणि यथोचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी हिंदुराष्ट्र सेनेने केली आहे. यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.