कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडिओ आला समोर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ओडिशातील बहनगा बाजार स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर कामकाज पूर्ववत होत आहे. मात्र हा रेल्वे अपघात भारतातील रेल्वे अपघातातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. अपघाताच्या वेदनादायक दृश्याने संपूर्ण देश हादरला आहे. घटनास्थळापासून हॉस्पिटलपर्यंत पीडितांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आता या घटनेचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे.

 

 

ओडिशा रेल्वे अपघाताबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो अपघाताच्या काही सेकंद आधीचा असल्याचा दावा केला जात आहे. हा भयानक व्हिडिओ ओडिशा टीव्हीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सफाई कर्मचारी डब्यातील फरशी साफ करत असून प्रवासी त्यांच्या बर्थवर आराम करत असल्याचे दिसत आहे. मग अचानक एक धक्का बसतो आणि जोरात ओरडत कॅमेरा थरथरू लागतो. व्हिडिओ अचानक थांबण्यापूर्वी सर्व काही अंधारामय होते. हा व्हिडिओ एका प्रवाशाने रेकॉर्ड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बालासोर रेल्वे अपघातात गुन्हेगारी निष्काळजीपणाच्या आरोपांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या पथकाने तपास हाती घेतला आहे. 2 जून रोजी संध्याकाळी 7:10 वाजता झालेल्या तीन ट्रेनच्या धडकेत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1175 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून १० लाख रुपयांची मदत दिली जात आहे. मृतदेहाची ओळख पटताच ९.५ लाख रुपयांचा धनादेश व 50 हजार रोख देण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.