१४ वर्षीय मुलीवर फॅमिली फ्रेंडचा अत्याचार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

१४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या फॅमिली फ्रेंडला काळाचाैकी पाेलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वारंवार होत असलेल्या अत्याचाराबाबत पीडित मुलीने पालकांना सांगितले व त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, मुलगी दडपणाखाली असल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले आणि तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार समोर आला.

भायखळा परिसरात १४ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत राहते. फॅमिली फ्रेंड म्हणून असलेला प्रसाद मोरे (२९) हा नेहमी घरी येत-जात असत. १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान तो वेळोवेळी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन चाळे करत असत. मुलीने याबाबत घरच्यांना वेळोवेळी सांगितले. मात्र, कोणीही तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.