कोच अटेंडन्टच ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एका अल्पवयीन मुलीसोबत धावत्या रेल्वेमध्ये घडलेल्या गैरप्रकारामुळे सध्या रेल्वे यंत्रणा आणि नागपूर हादरलं आहे. उपलब्ध माहितीनुसार पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एका कोच अटेंडन्टनं ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं असल्याचं लक्षात येताच आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलं ?

एका ७५ वर्षीय महिला त्यांच्या मुलीसह आणि नातू, नातीसह पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या. रेल्वे नागपूरनजीक असतानाच त्यांची 9 वर्षीय नात शौचालयाच्या दिशेनं गेली. त्यावेळी रात्रीचे 1 ते 1.30 वाजले होते. दरम्यानच्या वेळेत डब्यातील इतर प्रवासी गाढ झोपेत होते.

नागपूरच्या बुटीबोरीनजीक पाटलीपुत्र एक्सप्रेस आली असता, रेल्वेमधून प्रवास करणारी ९ वर्षीय चिमुकली बाथरूमला गेली. बऱ्याच वेळापासून तिच्यावर डोळा असणारा कोच अटेंडन्ट तिच्या मागे गेला आणि ती शौचालयात असतानाच त्यान एक क्षणही न दवडता शौचालयाच दार ढकलून आतमध्ये गेला आणि त्याने दार आतून बंद करून घेतलं. आरोपीन पीडितेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. भीतीपोटी आणि मदतीच्या अपेक्षेनं ती जोरात ओरडू लागली. आरोपी घाबरला आणि त्याने तिला पैशाचं आमिष दाखवत अश्लील चाळे सुरूच ठेवले. त्यानं जेव्हा शौचालयाच दार उघडलं तेव्हा मुलगी जिवाच्या आकांतानं तेथून पाळली.

मुलगी शौचालयाकडे जाऊन बराच वेळ झाला, तरीही परतली नाही. म्हणून तिची आई शौचालयाच्या दिशेनं गेली. आईला पाहताच ती चिमुकली ओरडत पुढे आली आणि तिने झालेला सव प्रकार आईला सांगितलं. संतापाच्या भरात आईनं आकांत केला आणि सहप्रवाशांना मदतीसाठी हाक दिली. घडल्या प्रकरणाची माहिती मिळताच संतप्त सहप्रवाशांनी आरोपीला बेदम मारहाण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.