जब तक टाइगर मरा नहीं, तब तक.. म्हणत टायगर ३ चा ट्रेलर रिलीज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी ‘टायगर३’ चा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कतरीना या दोघांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
‘टायगर ३’ च्या ट्रेलरची सुरुवात सलमानच्या आवाजात होऊन तो आपली कहाणी सांगतांना दिसत आहे.

टायगर ३ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होण्याआधी सलमान खानाने मंगळवारी रात्री सोशल मीडिया अकाऊंडवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सलमानचे फक्त डोळे दिसत आहे. त्यात तो एक संदेश देत आहे. उद्या… सकाळी टायगरला मेसेज सकाळी ११ वाजता..’, असं कॅप्शन त्याने दिले आहे. हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर हिन्दी, तमिळ, आणि तेलूगु भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.