एक हजार नाराळांपासून साकारले नारळेश्वर बाप्पा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोपरगाव येथील नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपांचे गणेश दर्शन घडविणारे सिंधी पंचायतच्या वतीने यंदा नारळाचा गणपती बाप्पा पाहायला मिळाले. वेगवेगळ्या प्रयोगमुळे या  मंडळाच्या सदस्यांचे नेहमीच कौतुक केले जाते.

कोपरगाव येथील सिंधी समाज गणेशोत्सव यंदा आपल्या ५० वे वर्ष साजरे करीत आहेत. नेहमीच वेगवेगळी कलाकृतीतून वेगवेगळ्या स्वरूपाच्या गणेश मुर्ती करून हे मंडळ नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. यावर्षी एक हजार नाराळांपासुन गणपती बाप्पा साकारले असुन या या नारळाच्या गणपतीला नारळेश्वर म्हणून प्रसिद्धी मिळत आहे.

नारळाचा गणपती पहाण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करून दर्शन घेत आहेत.ही अद्वितीय कामगिरी येथील नवयुवक अमित शर्मा, अंकित कृष्णाणी, धिरज काराचीवाला, निखिल खुबाणी, आयुष शर्मा, हर्षल कृष्णाणी, तनय आर्य, सागर कृष्णाणी यांनी आपल्या कल्पकतेने साकारली आहे.  हे नवयुवक या मंडळाची तिसरी पिढी असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमीच कोणाच्याही हाकेला धावून जेणारे व्यक्ती महत्त्व मनोहर कृष्णाणी यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, आपचे वडील आजोबापासुन या गणेश मंडळांचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवुन आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत. आता आमच्या मुलांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचे आम्हाला अभिमान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.