विवाहितेला ५ लाखांची मागणी करत जीवेठार मारण्याची धमकी

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यात पष्टाणे येथील माहेरी आलेल्या विविहीतेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेदहा वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील माहेर असलेल्या दामिनी मुकेश चव्हाण (वय २४) यांचा गुजरात राज्यातील उधना येथील मुकेश सुभाष चव्हाण यांच्यासोबत रितीरिवाजानुसार लग्न झालेले आहे. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यांनतर पती मुकेश याने विवाहितेला पाच लाखांची मागणी केली विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्याचा रागातून तिला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली तसेच सासरे, सासू आणि नणंद यांनी देखील पैशांसाठी शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला हा प्रकार सहन न झाल्याने विवाहित माहेरी निघून गेल्या विवाहितेने शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुकेश सुभाष चव्हाण, सासरे सुभाष सीताराम चव्हाण, सासू कलाबाई सुभाष चौधरी, नणंद रोशनी नितीन खरकर आणि भारती योगेश वाघ सर्व रा. उधना सुरत, राज्य गुजरात यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहोको चंदुलाल सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.