भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
झोपडीत बांधलेल्या ११ बकऱ्यांचा हिंस्त्रप्राण्याने फडशा पाडल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात घडली आहे. नर्मदाबाई सहादु भिल या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील नर्मदाबाई सहादु भिल यांच्या घरासमोरील झोपडीत बांधलेल्या ११ बकऱ्यांचा रात्री हिंस्रप्राण्याने फडसा पाडला. नर्मदाबाई भिल यांनी अतिशय गरीब परिस्थितीतुन एक एक रुपया जमवून ११ बकऱ्या घेतल्या होत्या. वनविभागचे वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांनी आज सकाळी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
यावेळी पिचर्डे पोलीस पाटील चेतना पाटील, उपसंरपच दिपक महाजन, ग्रामपंचायत सदस्य विजय महाजन, जगदीश पाटील, माजी उपसरपंच विनोद बोरसे, माजी पोलीस पाटील हेमराज महाजन, ज्ञानेश्वर भिल, किशोर सोनवणे, अरूण जोशी यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनामा करून शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.