समतानगरमध्ये मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबीर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गणेश उत्सवानिमित्त समतानगर येथे भव्य महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात एक हजार पेक्षा अधिक रुग्णांची  स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ,  पंचकर्म तज्ञ, लहान मुलांचे, जनरल सर्जन, जनरल फिजेशन अशा तज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी करण्यात आली. तसेच अनेक तरुण युव‌कांकडुन रक्तदान करण्यात आले.

सदर शिबीराचे उद्‌घाटन गणेशाची आरती करून व विश्र्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, निर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सपके, मंडळाचे किशोर जाधव, बाळा सोनार , मुकेश शिंदे वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक राजेंद्र सपकाळे, चेतन परदेशी, दीपक पाटील, विशाल निकम, रोशन ठाकरे, सागर सोनवणे, सतीश सोनवणे, भागेश पाटील, धीरजकुमार राठोड, दीपक वाणी, सचिन अडकमोल, क्रिस सनकत आदी समन्वयक उपस्थित होते. सदर शिबिरात विविध सामाजिक संघटनेचे सहकार्य लाभले.

या शिबिरासाठी  वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन,  निर्मिती फाउंडेशन, जनकल्याण युवा फाउंडेशन, आशितोष बहुउद्देशीय प्रतिष्ठान, समता समाज मित्र मंडळ, किंग ग्रुप समता नगर, शिवशक्ती मानव सेवा संस्थानचे अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी किशोर जाधव, बाळा सोनार, मुकेश शिंदे सचिन अडकमोल यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.