धक्कादायक; मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन (police helpline) नंबर 112 वर आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हेल्पलाईनला फोन करणाऱ्याने असा दावा केला आहे की, अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर(PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Threat Call) होणार आहे.

सदर धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सहारा एअरपोर्ट पोलीस, जूहू, अंबोली आणि बांगूर नगर पोलीस स्टेशन येथील पथक तसेच सीआयसीएफ आणि बीडीडीएस या पथकानं तपास कार्य सुरु केलं आहे. तिन्ही ठिकाणी पोलिसांनी तपास केला मात्र, अद्याप त्या ठिकाणी कोणतीही स्पोटके किंवा संशयास्पद वस्तू मिळालेली नाही. पोलीस आपला तपास करत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन 112 वर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता फोन आला होता. मुंबई पोलीस फोन करणाऱ्यांचा शोध घेत आहे. त्याचबरोबर फोन करणाऱ्याबाबातही अद्याप कुठलीच माहिती मिळाली नसल्याचे वृत्त आहे.

काय आहे प्रकरण

एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री साडेदहा वाजता मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करत मुंबईमध्ये तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं. अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर (PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट होणार असल्याचे अज्ञाताने सांगितलं होतं. या तीनही ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात असते. सणासुदीचे दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. अशातच धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तपास कार्य वेगानं करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.