मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट नक्की कधी ? जळगावात अधिकाऱ्यांकडे लाभार्थ्यांची आकडेवारीही नाही

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे सूत्र हाती घेतल्यापासून अनेक योजना आणि घोषणांचा पाऊस जनतेवर केला आहे. त्यापैकीच एक महत्वाची घोषणा त्यांनी शिधापत्रक धारकांसाठी केली होती दिवाळी निमित्ताने शंभर रुपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तू रेशनिंग दुकानावरून ज्या लाभार्थ्यांना दोन रुपये व तीन रुपये प्रति किलोने धान्य मिळते त्यांचे करिता उपलब्ध करून करून देण्याची घोषणा केली होती.
त्यासंदर्भात प्रत्यक्षात जळगाव तालुक्याला ७८ हजार ३६३ इतक्या किट्स मिळाले असून, त्यापैकी ७८ हजार २९६ इतक्या किट्सचे वाटप २०५ रेशनिंग दुकानांवर करण्यात आले असल्याचे पुरवठा तपासणी अधिकारी डी.बी. जाधव यांनी सांगितले. मात्र दिवाळी भेट ही लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीच मिळेल का? हा मोठा प्रश्न आहे. यावर त्यांनी कुठलेही भाष्य करण्यास टाळले. प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला यासंदर्भातील आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.