मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना धमकी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD असलेले डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नक्षलवाद्यांनी डॉक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॉक्टर राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी OSD म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पुर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉक्टर राहुल गेठे यांच्यावर होती.

त्यावेळी नक्षलवाद्यांनी डॉक्टर राहूल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार डॉक्टर राहूल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॉक्टर राहूल गेठे यांना लक्ष्य करत जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र त्यांच्या घरी पाठवलंय.

 काय आहे पत्रात ?

जय लाल सलाम

जय किसान

डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी.

एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॉक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयोंका बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

भामरागड / एटापल्ली

CPI – कमिटी

 

Leave A Reply

Your email address will not be published.