पदवीधरांनी स्वतः च्या संवैधानिक हक्कांसाठी लढावे – अ‍ॅड. जुबेर शेख

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांनी मागील दशकांत जगभरात व देशभरात फोफावत असलेले स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, उद्योजकीकरण रूपी प्रगतीचे वादळ थोपाऊन धरल्याचे निराधाजनक चित्र नाशिक विभागात पहायला मिळत आहे. नाशिक विभागातील पदवीधर आमदारांच्या औदासिन्यतेमुळे म्हणा अथवा अकार्यक्षमतेमुळे म्हणा या भागातील पदवीधर देशोधडीला लागला असल्याचे विदारक चित्र सर्वांना उद्दिन करून सोडत आहे.

नाशिक विभागात पदवीधरांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत उलटपक्षी नौकरीवर असलेले पदवीधर बेरोजगार झालेले आहेत. विविध उद्योग स्थालांतरीत झाल्याने किंवा बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर नोकर कपातीद्वारे पदवीधर बेरोजगार झालेला आहे व त्याचसोबत पदवीधरांकरीता शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अथवा पदवीधर आमदारांनी अकार्यक्षमता दाखवल्याने नविन उद्योजक तयार झाले नाही व त्यांच्याद्वारे नविन रोजगाराच्या संधी बेरोजगारांना उपलब्ध झाल्या नाही. याचसोबत कोरोना कालावधीत सर्वात जास्त नुकसान उठवणारा व समस्यांनी ग्रस्त असलेला घटक अर्थात पदवीधरच होता.

यासर्व नकारात्मक वातावरणात सकारात्मकता दाखविण्याची वेळ पदवीधरांकडे आलेली आहे. पदवीधरांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्या दिवसेंदिवस वाढत जात असतांना पदवीधरांच्या मतांवर जिंकून येणार परत एकदा यावेळेस पदवीधर निवडणूकीद्वारे तुमच्याकडे मतांची भिक मागण्याकरीता येतील तेव्हा पदवीधरांना या निगरगट्ट राज्यकत्यांना बेधडक सवाल विचारता यावा म्हणुन सर्व पदवीधरांचे नाव नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत नोंदविले जाणे काळाची गरज आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अभियान 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरु झालेला आहे व नोंदणीची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2022 आहे. नोंदणीकरीता गुगल वर सहज उपलब्ध फॉर्म नं. 18 भरुन त्यासोबत फोटो, डिग्री सर्टिफिकेट अथवा मार्कशिट आधार कार्ट व मतदानकार्ड या कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत व अटेस्टेड झेरॉक्स जोडून संदर फॉर्म जवळच्या तहसील कार्यालयात जमा करावयाचा आहे.

सर्व पदवीधरांना जागरुक होऊन स्वतः च्या संवैधानिक हक्कांसाठी लढावेच लागेल याकरीता फॉर्म भरून रास्त मागण्या मान्य करवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल, अशी माहिती मायनॉरिटी राईट फेडरेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष जुबेर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.