कु-हाकाकोडा येथे ग्रामीण रुग्णालय होणे काळाची गरज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
कु-हाकाकोडा – मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटच गाव म्हणजे कु-हा काकोडा 35 कि, मी आहे आणि जळगाव जिल्ह्याचे शेवटचे गाव हे शंभर किलोमीटर आहे. कु-हा काकोडा या गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत आहे या गावाला लागून 50 गावे आहेत यामध्ये अतिदुर्गम भाग डोंगराळ भाग आदिवासी भाग, या गावांमध्ये अनु सूचीत जाती जमातीचे लोक या भागांमध्ये वास्तव्य करून राहत आहेत
कु-हा काकोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा कमी आहेत कर्मचारी संख्या अपुरी आहे ,औषध साठा कमी येतो त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाहिजे त्यासुविधा पुरेशा मिळत नाही, त्यामुळे त्यांना तालुका स्तरावर जावे लागते ,अंतर खूप मोठे आहे बऱ्याचदा रुग्ण दवाखान्यात पोहोचेपर्यंत रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या परिसरामध्ये अस्वल ,सर्प हिंसक वन्य ,स्वरूपाचे प्राण्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते मानव जातीवर आक्रमण व हल्लेकरत असतात, त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इजा जखमी होत असतात त्यांच्यावर त्वरित उपचार होत नाही,
डोंगराळ, नदी पात्र ,नाले,खोले आहेत महसूल जमीन यामध्ये काम करणारे शेत,मजूर व शेतकरी यांना बऱ्याचदा सर्पदोष खूप मोठ्या प्रमाणात होत असतात
विष प्राशन करणारे नागरिक व महिला व मुले दरवर्षी विष पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे , उपचार न झाल्यामुळे त्याचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत
महिलांच्या बाळंतपण साठी सुद्धा व्यवस्था नसल्याकारणाने बऱ्याचदा महिला प्रवासात असताना डिलिव्हरी झालेले असे प्रकार बऱ्याचदा झालेले आहेत
अपघाताचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतात
या परिसरात उपचार नसल्याकारणाने शंभर किलोमीटर जळगाव जावे लागते तोपर्यंत त्याच्या खूप त्रास सहन करावा लागतो सर्पदोष, हिंसकप्राण्याने हमला केलेले, विष प्रशान केलेले, डिलिव्हरी महिला जर मृत्यू झाला तर यांना पीएम साठी तालुकास्तरावर जिल्हा व तालुका स्तरावर जावे लागते व सोबत असलेल्या नातेवाईकांचे खूप मोठे त्रासाला सामोरे जावे लागते ,
सर्व बाबीचा विचार करून लोकप्रतिनिधींनी या परिसरातील आदिवासी समाजातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय देऊन न्याय द्यावा अशी मागणी कु-हा परिसरातील आदिवासी भिल्ल तडवी पावरा फाशे पारधी, धनगर बंजारा आदिवासीकोळी समाजातील व सर्व स्तरातून मागणी पुढे येत आहे
मात्र आता नवीन सरकार आले ते म्हणजे देवेंद्र फडणीस, शिंदे सरकार यांच्यावर नागरिकांचा या परिसरातील आदिवासी लोकांचा विश्वास आहे आणि त्यांचे सरकारमधील घटक लोकप्रिय आमदार ज्यांची ओळख झालेली आहे ते तरुण तडफदार आ. चंद्रकांत पाटील हेच ते स्वप्न पूर्ण करू शकतात असा या परिसरातील नागरिकांचा विश्वास आहे आणि ते करतील या शंका नाही अशी जनतेची अपेक्षा आहे

Leave A Reply

Your email address will not be published.