चाळीसगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यात सध्या चोरांचा सुळसुळाट माजला आहे, देवस्थानच्या दान पेटी बरोबर इतर चोरींकडे आपला मोर्चा वळवला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील दोन दिवसांपूर्वीच पाटणादेवी मंदिरातील दान पेटी वर चोरांनी हात मारला. दुसऱ्या दिवशी हिंगोणे येथील शाकंभरी देवीच्या मंदिरातून देवीचे दाग दागिने सह दान पेटी वर चोरांनी हात मारला तोच काल चितेगाव येथे अज्ञात इसमाने गावाजवळ असलेल्या प्लॉट भागातील कांद्याची चाळ दि 15 रोजी रात्री जाळून नुकसान केले आहे.
तर दुसऱ्या घटनेत रांजणगाव शिवारात शेतात असलेल्या शेतातील विहिरीतील 3 HP ची 8 हजार रुपये किमतीची ईलेक्ट्रिक जलपरी मोटार पंप 10 ते 11 च्या रात्री चोरून नेली आहे.

तर शहरातील करगाव रोडवरून दारात लावलेली 30 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेनडर मोटारसायकल दि 9 ते 10 च्या रात्री चोरून नेली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.